जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीसाठी ३६० जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीचे पडघम सुरू झाले आहे. गेल्या आठवड्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम सुरू होते. गुरूवारी १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत एकुण ३६० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अशी माहिती जिल्हा दुध संघाच्या निवडणूक अधिकारी संतोष बिडवाई यांनी सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर १४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान माघारीची मुदत असून अंतीम उमेदवारी यादी व चिन्हा वाटप २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.  त्यानंतर १० डिसेंबर रेाजी सकाळी ८ ते दुपारी ४ दरम्यान मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणी व निकाल ११ डिसेंबर रोजी होणार आहे.

जिल्हा दुध संघासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालतीबाई महाजन, आमदार चिमणराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या पत्नी छाया पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, दुध संघाच्या विद्यमान अध्यक्षा मंदा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ, माजी आमदार दिलीप वाघ, आमदार पत्नी गिता शिरीष चौधरी यांच्यासह आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

 

Protected Content