Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दरीत बस कोसळून ३३ प्रवासी ठार

bus accident kashimir

श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मिरमध्ये दरीत बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३३ प्रवासी ठार तर २२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, केशवानहून किश्तवाड या ठिकाणी ही बस चालली होती. त्याच प्रवासादरम्यान ही बस दरीत कोसळली आणि ३३ जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. जखमी रूग्णांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळाली नाही. तथापि, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version