Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवपूर कन्हाळ्यात ३२ हजारांची गावठी दारू पकडली

भुसावळ, प्रतिनिधी ।  तालुक्यातील शिवपूर कन्हाळा गावात पोलिसांनी धाड टाकून पोलिसांनी ३२ हजार रुपये किमतीची गावठी दारू आणि अन्य साहित्य जप्त केले.  रविवारी केलेल्या या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे .

तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिवपूर कन्हाळा गावांत सार्वजनिक जागेवर सलीम हसन गवळी ( रा.कन्हाळा ) हा गावठी हटभट्टीची दारू गाळण्याचे गूळ , मोह , नवसागर मिश्रित द्रव्य कच्चे रसायन 4 ड्रम (800 लिटर ) व गावठी हटभट्टीची 30 लिटर तयार दारू अंदाजे किंमत 32100 रु मालासह मिळुन आल्याने. त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनी अमोल पवार, पोहेकाँ विठ्ठल फुसे , जगदीश भोई , शिवाजी खंडारे यांनी केली .

Exit mobile version