Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शहरातील हनुमान नगर भागातील ३२ वर्षीय विवाहिता बेपत्ता

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हनुमान नगर भागातील ३२ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पतीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील हनुमान नगर भागातील अश्विनी नवनाथ पवार (वय – ३२) ही विवाहीता दि‌. २ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

विवाहीतेचे पती नवनाथ हरिदास पवार यांनी परिसरात शोध घेतला असता अश्विनी पवार या आढळून न आल्याने शुक्रवार, दि. ३ जून रोजी नवनाथ पवार यांनी पाचोरा पोलिसात मिसिंग दाखल केली असून बेपत्ता झालेल्या अश्विनी पवार यांचा शोध पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल सुर्यकांत नाईक हे घेत आहेत.

Exit mobile version