Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : शिंदेंसोबत शिवसेनेचे ३२ आमदार : जिल्ह्यातील तिघांचा सहभाग

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील तब्बल ३२ आमदार फुटल्याची माहिती आली असून यात जळगाव जिल्ह्यातील तीन आमदारांचा समावेश असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचा मोठा गट असल्याची माहिती सकाळपासून आली असली तरी यात त्यांच्यासह नेमके किती सदस्य आहेत याची माहिती मिळाली नव्हती. या पार्श्‍वभूमिवर, रात्री उशीरा शिंदे यांच्यासोबत ३२ आमदार असल्याची माहिती समोर आली असून या संदर्भात टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीने बातमी दिली आहे.

या वृत्तानुसार जळगाव जिल्ह्यातील किशोरआप्पा पाटील, चिमणराव पाटील आणि लताताई सोनवणे या तीन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकूण ३२ आमदार असल्याची माहिती असून यात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचाही एक आमदार आहे. या आमदारांमध्ये-

एकनाथ शिंदे
विश्वनाथ भोईर
राजकुमार पटेल
महेंद्र थोरवे
भारत गोगावले
महेंद्र दळवी
अनिल बाबर
महेश शिंदे
शहाजी पाटील
शंभुराज देसाई
बालाजी कल्याणकर
ज्ञानराज चौगुले
रमेश बोरणारे
तानाजी सावंत
संदिपान भुमरे
अब्दुल सत्तार
नितीन देशमुख
प्रकाश सुर्वे
किशोर पाटील
सुहास कांदे
संजय सिरसाट
प्रदीप जैस्वाल
संजय रायमुलकर
संजय गायकवाड
शांताराम मोरे
श्रीनिवास वनगा
प्रताप सरनाईक
प्रकाश आबिटकर
चिमणराव पाटील
नरेंद्र बोंडेकर
लता सोनावणे
यामिनी जाधव
बालाजी किनिकर

या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे समर्थक अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मात्र शिवसेनेच्या सोबतच राहण्याचे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version