Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पप्पू कलानींच्या गटासह उल्हासनगरातील ३२ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल

उल्हासनगर | येथील राजकारणातील मातब्बर समजल्या जाणार्‍या पप्पू कलानी गटासह महापालिकेतील तब्बल ३२ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला असून यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांच्यासह त्यांच्या सहकारी २२ नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला. पंचम कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन आपल्या सहकार्‍यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

कलानी गटाचे २२ आणि इतर १० अशा ३२ नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे. आगामी उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी मोठा हादरा मानला जात आहे. मागील निवडणुकीत हे २२ नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दरम्यान, या प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना उल्हासनगर महापालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला.

 

Exit mobile version