Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगर तालुक्यात कोरोनाचा स्फोट; ३१ नवीन रूग्ण

मुक्ताईनगर प्रतिनिधी । पहिल्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग थोपवून धरलेल्या मुक्ताईनगर तालुक्यात आता याचा संसर्ग वाढीस लागला आहे. आज तब्बल ३१ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात लॉकडाऊन लागून बराच काळ उलटला तरी कोरोनाचा संसर्ग आढळून आला नव्हता. तथापि, गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही तालुक्यांमध्ये सातत्याने नवीन रूग्ण आढळून येत आहेत. यातच आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यात तब्बल ३१ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. यात मुक्ताईनगर शहरातील तीन तर डोलारखेडा येथील २८ रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आजच्या रूग्णसंख्येमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या १७८ इतकी झालेली आहे. यातील चार जणांचा मृत्यू झाला असून ४९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १२५ रूग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Exit mobile version