Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुलीचा विनयभंग करणाऱ्याला ३ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गच्चीवर झोपलेल्या अल्पवयीन मुलीला मिठी मारुन विनयभंग करणार्‍या महेश उर्फ गुड्ड्या अनिल भोसले (वय-१९, रा. पिंप्री गणेशपुर ता. चाळीसगाव) या आरोपीला विशेष पोक्सो न्यायालयाने तीन वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावली. यात सात जणांची साक्ष महत्वाची ठरली आहे.

 

पिडित अल्पवयीन तरुणी घराच्या गच्चीवर झोपलेली असतांना महेश उर्फ गुड्ड्या भोसले हा त्याठिकाणी आला, आणि त्याने पिडीतेला मिठी मारुन तिचा विनयभंग केल्याची घटना दि. १५ मे २०१६ रोजी घडली होती. दरम्यान, पिडीतेने आरडाओरड केल्यानंतर पिडितेच्या आईने त्याठिकाणी येवून मुलीची सुटका करीत आरोपीलापकडले. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात आरोपी महेश भोसले विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटल्याचे कामकाज विशेष पोक्सो न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्या न्यायालयासमोर सुरु होते.

 

सात जणांची साक्ष ठरली महत्वपुर्ण

या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडीतेसह तिची आईची साक्ष महत्वपुर्ण ठरली. दरम्यान, साक्ष व पुराव्याअंती महेश भोसले याला आरोपी धरले. यामध्ये सरकार पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता व विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी प्रभावी युक्तीवाद करीत पुरावे सादर केले. यावरुन भोसले याला दोषी ठरवित त्याला तीन वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावली.

 

Exit mobile version