Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात दिवसभरात ३ बाधित रूग्ण आढळले; ४ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ३ संक्रमित रूग्ण आढळले. तर ४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात केवळ २५ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्हा रूग्णालयाने दिलेल्या कोरोना अहवालानुसार जळगाव शहर १, बोदवड तालुक्यातून १ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ३ संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ६४१ हजार रूग्ण बाधित आढळून आले आहे. तर १ लाख ४० हजार  ४१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर उर्वरित २५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात  उपचार घेत आहे. अशी महिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

Exit mobile version