कोरोना : जिल्ह्यातून आज ३ संक्रमित रूग्ण आढळले; ४ रूग्ण झाले बरे !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात ३ कोरोना संक्रमित रूग्ण आढळले आहेत. तर ४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात आज केवळ जळगाव शहरातील तीन संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तसेच आज दिवसभरात चार रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७२९ रूग्ण कोरोना संक्रमित आढळून आलेत. त्यापैकी १ लाख ४० हजार १३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर जिल्ह्यात २४ संक्रमित रूग्ण उपचार घेत आहे. आजपर्यंत एकुण २ हजार ५७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

Protected Content