Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात दुकान फोडून लांबविली २७ हजारांची रोकड

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शहरातील शिवाजीनगर भागात असलेला किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी 27 हजार रुपयांची रोकड लांबविली. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, किशोर मधुकर वखरे वय-36 रा. शिवाजीनगर पाचोरा यांचे घरासमोर किशोर किराणा व ट्रेडिंग नावाचे दुकान आहे. 18 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद केले मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे पत्रे उचकटून दुकानातील गल्लीतील 27 हजार रुपयांची रोकड लांबवली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता उघडकीला आला. याप्रकरणी किशोर भोकरे यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाल जाधव करीत आहे.

 

 

 

Exit mobile version