Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२७ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव येथील एका २७ वर्षीय युवकाने पुणे येथील त्याचे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, दहिगाव येथील पुष्कर नंदकुमार महाजन २७ वर्षीय युवकाने शनिवार, दि. ९ रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास आपल्या पुणे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्त्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

याबाबत मयत पुष्करचा लहान भाऊ टीनु नंदकुमार महाजन  याने तळेगाव पोलिसात माहिती दिल्यावरून पोलीसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

पुष्कर हा गेल्या तीन ते चार वर्षापासून पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरीला होता. दोन वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याच्या आत्महत्येने गावात  हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version