Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२५ पिलर, १८ गाळ्यांच्या एक किलोमीटर लांब पूलास सुरुवात (व्हिडीओ)

जळगाव, संदीप होले | जळगावातील पिंप्राळा रेल्वे गेट येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे ओव्हरब्रिज अर्थात उड्डाण पुलाचे भूमिपुजन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून लागलीच कामाला जलदगतीने कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे.

शहरातील वाहन धारक मोठ्या प्रमाणात पिंप्राळा रेल्वे गेट ओलांडून अलीकडे वा पलीकडे जात असतात. मात्र रेल्वे गेट बंद असल्यावर बऱ्याच वेळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना, येथील माथाडी कामगार, शहरातील नागरिक यांना या रेल्वे पास होत नाही तोपर्यंत थांबावं लागतं. त्यामुळे या ठिकाणी एखादा उड्डाण पूल असावा अशी जळगाव वासियांची अनेक दिवसापासून इच्छा होती. ती इच्छा लवकरच पूर्ण होणार असून पिंप्राळा रेल्वे गेटवर पूल तयार करण्याचं काम सुरू झालं आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उड्डाण पुलाच्या कामाचे विधीवत पूजन करून कामास प्रारंभ करण्यात असून या पुलामुळे रहदारीला आळा तर बसेलच मात्र त्यासोबतच वेळेची बचत होऊन होऊन प्रवास करणार्‍या नागरिकांना इच्छित स्थळी वेळेवर पोहोचता येणार आहे. त्यामुळे शहरवासी यामध्ये आनंदाचं वातावरण असून लवकरात लवकर पूल तयार व्हावा अशी इच्छा नागरिक व्यक्त करीत आहेत.

ऑक्टोबर २०१९ मध्ये पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलास मंजुरी मिळाली होती त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने सार्वजनीक बांधकाम खात्याकडे पाच कोटी रूपयांचा निधी वर्ग करण्यात आल्यावर या कामाला खर्‍या अर्थाने गती मिळाली. गुजरातमधील मिरर इन्फ्रा कंपनीला या पुलाच्या कामाचे कंत्राट मिळाले असून या कामासाठी ४६ कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. २५ पिलर आणि १८ गाळ्यांचा समावेश असलेला हा पूल एक किलोमीटर लांब राहणार आहे.

पिंप्राळा रेल्वे गेटच्या उड्डाण पुलाच्या कामाचा शुभारंभाने जळगाव शहरात विकासकामांच्या नवीन युगाचा आरंभ झाला असून शहर आणि ग्रामीण या भागांना जोडण्यासाठी रस्त्यासह पुलांच्या कामांना गती मिळाली आहे.

व्हिडीओ लिंक

Exit mobile version