जिल्ह्यात आज २४५ नवीन पॉझिटीव्ह तर, २७० रूग्णांनी कोरोनावर मिळवला विजय !

जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात २४५ नवीन कोरोना बाधीत आढळून आले असले तरी आजच २७० रूग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यामुळे कोरोना विरूध्दच्या लढाईला यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायमच असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यासोबत आता बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात २४५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे आजच २७० रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज १२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात २४५ कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ५७ रूग्ण हे जळगाव शहरातल आहेत. याच्या खालोखाल जामनेर-३० व चाळीसगाव-२९ रूग्ण आढळले आहे. उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव ग्रामीण १७, भुसावळ-१३, अमळनेर-२८, चोपडा-२६, पाचोरा-४, भडगाव-१२, धरणगाव-३, यावल-०२, एरंडोल-१, रावेर-२, पारोळा-५, मुक्ताईनगर-१०, बोदवड-५, अन्य जिल्हा-१ असे एकुण २४५ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय एकुण रूग्णसंख्या
जळगाव शहर- २८३५, जळगाव ग्रामीण-५३२, भुसावळ-८९१, अमळनेर-७२१, चोपडा-७६७, पाचोरा-३९५, भडगाव-४३१, धरणगाव-४९३, यावल-४६३, एरंडोल-५०३, जामनेर-७७९, रावेर-६८७, पारोळा-४७५, चाळीसगाव-५०२, मुक्ताईनगर-३४३, बोदवड-२४४, इतर जिल्हे-४२ असे एकुण ११ हजार १०३ रूग्ण आढळले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ७ हजार ५५७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. बाधितांपैकी ३ हजार २८ रूग्ण उपचार घेत असून आजपर्यंत ५१८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content