Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात वायूप्रदूषणामुळे २१ लाख मृत्यू – अहवाल

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वायुप्रदूषणामुळे जगभरात २०२१ साली ८१ लाख लोकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये भारतातील २१ लाख व चीनमधील २३ लाख मृतांचा समावेश होता, असे युनिसेफ व अमेरिकेतील हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट संस्था यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त अहवालात म्हटले आहे.

२०२१ साली वायुप्रदूषणामुळे पाच वर्षे वयाखालील मुले मोठ्या संख्येने मरण पावली. हा आकडा भारतात १,६९,४००, पाकमध्ये ६८,१०० होता. दक्षिण आशियामध्ये वायूप्रदूषणामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. २०२१मध्ये वायुप्रदूषणामुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू झाले. वायू प्रदूषणाचा सर्वाधिक फटका गंगा नदी किना-यावर राहणा-या लोकांना बसत आहे. प्रदूषणामुळे गंगा किनारी राहणा-या लोकांचे आयुर्मान सात वर्षांनी घटले आहे. प्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणामुळे लोकांच्या फुफ्फुसे आणि हृदयावरच परिणाम होतो असे नाही तर मेंदूवर देखील परिणाम होतो.

सध्या देशातील ९० टक्के लोक दूषित हवेतून श्वास घेत आहेत त्यामुळे मज्जारज्जूशी संबंधित आजार होत आहेत. वाढत्या प्रदूषणाने हृदयरोग, कर्करोग व फुफ्फुसांचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाढत्या प्रदूषणाचा परिणाम गर्भवती महिला, नवजात बालके व विद्यार्थ्यांवर देखील होऊ लागला आहे. वाढत्या प्रदूषणाला वेळीच आळा घातला नाही तर ही समस्या आणखी गंभीर होईल. तसे होऊ द्यायचे नसेल तर प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने आताच ठोस पावले उचलून नियोजन करायला हवे त्यासाठी पर्यावरण तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी.

हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट या संस्थेच्या अध्यक्ष एलेना क्राफ्ट यांनी सांगितले की, अहवालाच्या निष्कर्षांमुळे जनजागृती होईल व प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळेल. वायुप्रदूषणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. ते प्रमाण कमी होण्यासाठी देशांनी प्रभावी उपाययोजना केली पाहिजे, असेही क्राफ्ट यांनी सांगितले. हे प्रदूषण कमी करण्यासाठी जगभरात विविध उपाय योजण्यात येत असले तरी ते पुरेसे नाहीत. लहान मुले, युवक, मध्यमवयीन लोक, वृद्ध व्यक्ती यांना वायुप्रदूषणामुळे खूप त्रास सोसावा लागतो. औद्योगिकीकरणामुळे कारखानदारी वाढली. कारखान्यात तयार होणारे घातक रसायने हवेत सोडण्यास सुरवात झाली त्यामुळे हवा दूषित होऊ लागली. कारखान्यांमध्ये उत्पादनासाठी वापरण्यात येणा-या औद्योगिक प्रक्रियेमुळे वेगवेगळे विषारी वायू तयार होतात. कारखान्यातून उत्सर्जित होणारे होणारे हे विषारी वायू वातावरणात तरंगतात यामुळे वायुप्रदूषणात वाढ होते.

Exit mobile version