Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मध्यावधी निवडणुका झाल्यास एमआयएमचे 20 आमदार निवडून येतील : आमदार फारुख शहा

mim

 

धुळे (प्रतिनिधी) महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामागे भाजपचीच खेळी आहे. महाशिवआघाडीचे हे सरकार अस्थिर सरकार असेल, केवळ तीन ते चार महिने हे सरकार असेल. तसेच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्यास एमआयएमचे 20 उमेदवार निवडून येतील, असा दावा धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी केला आहे. ते एका खाजगी वृत्त वाहिनीशी बोलत होते.

 

यावेळी शहा यांनी म्हटले की,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सपोर्ट करून पक्षाच राजकीय मरण ओढवून घेतले आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला सपोर्ट केल्याने अल्पसंख्यांक समाज यापुढे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही. आता ‘जिसकी लाठी उसकी भैस’ अशी स्थिती आहे. भाजपकडे सत्तेची पॉवर आहे. हा सगळा खेळ भाजपचाच आहे. 15 दिवसाच्या आत ही राष्ट्रपती राजवट संपुष्टात येईल, असेही शाह म्हणाले. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार अस्थिर असेल, हे सरकार केवळ तीन-चार महिन्यांचे असेल. त्यानंतर भाजपचेच सरकार स्थापन होईल, असे ते म्हणाले.

Exit mobile version