Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन लाखासाठी विवाहितेचा छळ

mahila

 

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन घर घेण्यासाठी माहेरहून २ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरकडील मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

फैजपूर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूर शहरातील इस्लामपूरा येथील माहेर असलेल्या आसमाबी अझरोद्दिन शेख (वय-२८) यांचा विवाह भुसावळ येथील अझरोद्दीन रईसोद्दिन शेख यांच्याशी रितीरिवाजानुसार २०१७ मध्ये झाला. लग्नानंतर सुरूवातीचे दोन महिने चांगले गेले. त्यानंतर पती अझरोद्दीन शेख याने विवाहितेला माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लाख रूपये आणावे अशी मागणी केली. परंतू आई वडीलांची परिस्थिती नाजूक असल्याने पैश्यांची पुर्तता करून शकल्या नाही. याचा राग आल्याने पती अझरोद्दीन याने विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तर सासू, सासरे, दिर, मोठी नणंद यांनी गांजपाठ केला. हा छळ सहन न झाल्याने विवाहिता बाहेरी निघून आल्या. शनिवार १९ फेब्रुवारी रोजी विवाहितेन फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती अझरोद्दीन रईसोद्दिन शेख, सासून रजीयाबी रईसोद्दीन शेख, रईसोद्दिन अमरोद्दिन शेख, मोहंमद रइसोद्दिन शेख, सर्व रा. भुसावळ, सिरीनबी ईस्माईल शेख, आणि नसरिबी जुबेर शेख रा. जामनेर यांच्याविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमजद खान पठाण करीत आह.

Exit mobile version