Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यातील २११ केन्द्रावर २ लाख १० हजार ५५६ मतदार बजावतील मतदानाचा हक्क

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुढील महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्या अंतर्गत रावेर लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत असून १३ मे रोजी मतदान होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून यावल येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी १६ एप्रिल रोजी मंगळवारी तहसील कार्यालयात तालुक्यातील मतदारांची संख्या तसेच प्रशासकीय व्यवस्थेबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी निवडणुक कार्यक्रमा संदर्भातील पत्रकारांना माहिती देतांना रावेर लोकसभा अंतर्गत येत असलेला यावल तालुका रावेर आणि चोपडा अशा दोन विधानसभा क्षेत्रात समाविष्ट आहे.

रावेर विधानसभा क्षेत्रातील तालुक्यात ६९ गावातील १४४ मतदान केंद्र असून १ लाख ४२हजार २३३ मतदार तर चोपडा विधानसभा क्षेत्रात ४८ गावातील ६७ मतदान केन्द्र राहणार असून दोन्ही विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या तालुक्यातील दोन लाख १० हजार ५५६ मतदार लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील. यात रावेर विधानसभा क्षेत्रातील १लाख ९ हजार ८०पुरूष तर १ लाख एक हजार ४७५ महिलर मतदारांचा आणि एक तृतीय पंथीय मतदाराचा समावेश आहे. तर चोपडा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील १ लाख एक हजार ४७५ मतदारांचा समावेश असेल.

सातपुडा या कुशीत वसलेल्या तालुक्यातील लंगडा आंबा ऊस मळी जामन्या, गाडऱ्या, आंबा पाणी, रुईखेडा आणि चारमळी ही गावे मोबाईल सेवेच्या कक्षेबाहेर असल्याने, मतदानाची टक्केवारी आणि समस्येसाठी रनरची व्यवस्था करण्यात आली असल्याचीही तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले आहे. कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे आणि मत पेट्या आणणे. क्षेत्रीय अधिकारी आदींसाठी वाहतुकीसाठी बस, मिनी बसेस, कृषी, जिप आदि वाहतूक साधनाचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार नाझीरकर व निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी पत्रकारांना दिली.

Exit mobile version