Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यात 19.5 मिलीमीटर पाऊसाची नोंद

rainwater

जळगाव (प्रतिनिधी) बहुप्रतिक्षेनंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 19.5 टक्के इतका पाऊस पडला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 663.3 मिलीमीटर इतके असून मागील वर्षी 25 जून, 2018 पर्यंत वार्षिक सरासरीच्या फक्त 83.3 टक्के म्हणजेच 12.6 मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. तर यावर्षी मात्र 19.5 मिलीमीटर म्हणजेच मागील वर्षीपेक्षा 63.80 मिलीमीटर इतका कमी पाऊस पडला आहे.

 

जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा विचार केला असता आजपर्यंत सर्वाधिक 56.5 टक्के इतका पाऊस जामनेर तालुक्यात पडला असून सर्वात कमी म्हणजेच 2.9 टक्के पाऊस जळगाव तालुक्यात पडला आहे. जिल्ह्यात 25 जून रोजी एका दिवसात 2.3 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे.

 

जिल्ह्यात तालुकानिहाय आजपर्यंत (25 जून, 2019) पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (वार्षिक सरासरीशी टक्केवारी)

 

जळगाव तालुका – 2.9 मिलीमीटर (0.4 टक्के), जामनेर- 56.5 मि.मी., (7.8), एरंडोल- 7.5 मि.मी. (1.2), धरणगाव – 26.6 मि.मी. (4.3), भुसावळ – 34.2 मि.मी. (5.1), यावल – 19.6 मि.मी. (2.8), रावेर – 20.4 मि.मी. (3.1), मुक्ताईनगर – 6.8 मि.मी. (1.1), बोदवड – 10.3 मि.मी. (1.5), पाचोरा – 39.4 मि.मी. (5.3), चाळीसगाव – 20.8 मि.मी. (3.1), भडगाव – 12.8 मि.मी. (1.9) अंमळनेर – 14.1 मि.मी. (2.4), पारोळा – 10.6 मि.मी. (1.7), चोपडा – 10.0 मि.मी. (1.5) याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 2.9 टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Exit mobile version