Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हास्तरीय लोकशाही दिनी 175 अर्ज दाखल

fab18de6 ac78 4467 ac05 10fe4109e06b

 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 175 तक्रार अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने सहकार, जिल्हा परिषद, महानगर पालिका, महसुल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस व महिला व बालकल्याण विभाग यासह इतर विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे.

 

लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलभ रोहन, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) बी. ए. बोटे, सहायक आयुक्त समाजकल्याण योगेश पाटील, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

लोकशाही दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेवून सर्व तक्रार अर्ज संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले. या सर्व तक्रार अर्जांवर संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी. जेणेकरुन तक्रारदारांना पुन्हा लोकशाही दिनात तक्रार घेऊन येण्याची आवश्यकता भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी यावेळी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. त्याचप्रमाणे नागरीकांनी लोकशाही दिनाशी संबंधितच तक्रारी मांडाव्यात. न्यायप्रविष्ठ असलेल्या विषयांच्या व इतर तक्रारी लोकशाही दिनात आणू नयेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Exit mobile version