Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा ग्रामसुरक्षा दल व पोलीस मित्र मेळाव्याचे उद्घाटन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात शुक्रवारी ११ मार्च रोजी दुपारी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर यांच्या उपस्थितीत जिल्हा ग्रामसुरक्षा दल व पोलीस मित्र मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यासह अधिकारी उपस्थित होते.

 

पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांच्याहस्ते जिल्हा ग्रामसुरक्षा दल व पोलीस मित्र मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पोलिस मित्र व जिल्हा ग्राम सुरक्षा दलातील युवकांना लाठी, शिट्टी व टी-शर्ट देण्यात आले. तसेच कासोदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गंभीर गुन्ह्यात जिल्हा ग्राम सुरक्षा दलातील तरुणांनी संशयितांना पकडून दिल्यामुळे तो गुन्हा उघडकीस आला म्हणून त्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, जिल्ह्याच्या दृष्टीने पोलिस कर्मचार्‍यांची संख्य अत्यंत तोकडी आहे. ५० हजार लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यासाठी केवळ साडेतीन हजार पोलिस कर्मचारी आहे. कायद्याने सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांसारखे अधिकार दिले आहे. त्याचा वापर केवळ परदेशात होत होता. मात्र आता ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्रांच्या माध्यमातून त्याचा वापर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. पुढे बोलतांना म्हणाले की, स्वातंत्र्यपुर्व काळापासून पोलिस मित्र ही संकल्पना राबविली जात आहे. परंतु बदलत्या काळानुसार त्यामध्ये बदल होत आहे. पोलिस खात्यावर वेळोवेळी टिका होत असते. परंतु सुमारे १० हजार लोकसंख्येच्या मागे एक पोलिस कर्मचारी असतो. परंतु तरी देखील इतर विभागांच्या तुलनेत पोलिस दल जास्तीत जास्त काम करीत असतो. जिल्ह्याचा लोकसंख्या व भौगोलिक दृष्टीने विचार केला तर सद्याच्यास्थितीत असलेली पोलिस कर्मचार्‍यांची संख्या अत्यंत तोकडी आहे. पोलिस हा वर्दीतील सामान्य नागरिक आहे तर सर्वसामान्य नागरिक हा खरा पोलिस असल्याचे ते यावेळी म्हणाले.

भाग १

भाग २

भाग ३

Exit mobile version