Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळ रेल्वे स्थानकात आढळल्या १७ बेवारस मोटारसायकली

bhusaval motar cycle

भुसावळ, प्रतिनिधी | येथील रेल्वे स्थानकाच्या दुचाकी तळावर बेवारस पडलेल्या १७ मोटार सायकली येथील बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. पोलीस परिवहन विभागाकडे या मोटारसायकल मालकांची चौकशी करणार आहेत.

 

जिल्ह्यात मोटारसायकल चोरट्यांची टोळी सक्रिय असून दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला रेल्वे स्थानकावरील सायकल स्टँडची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी व कर्मचारी यांनी तिथे पाहणी केली असता १७ मोटारसायकली बेवारस आढळून आल्या आहेत.

Exit mobile version