Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव ग्रामीणमधून १६ जणांचे २६ अर्ज दाखल

Electronic voting machine

धरणगाव, प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव ग्रामीण मतदार संघात आज (दि.४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १६ उमेदवारांचे २६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये सात जणांनी नोंदणीकृत राजकीय पक्षातर्फे तर नऊ जणांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

 

उमेद्वारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये राज्य मंत्री गुलाबराव पाटील (शिवसेना), पुष्पा महाजन व ज्ञानेश्वर महाजन (रा.काँ.), मुकुंद रोटे (मनसे), संजय बाविस्कर (बसपा), दिलीप पाटील (शेकाप), उत्तम सपकाळे (वंचित आघाडी) तर विशाल देवकर, लक्ष्मण पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, जितेंद्र देशमुख, माधुरी अत्तरदे, ईश्वर सोनवणे, प्रदीप मोतीराया, संभाजी कोळी व तुळशीराम पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. उद्या अर्जांची छाननी असून ७ ऑक्टोबर रोजी माघारीची मुदत आहे. त्या नंतरच लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version