Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पॅन्टच्या खिश्यातून १५ हजाराची रोकड लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मील परिसरातील एका घरातून १५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निर्मलाबाई जगन्नाथ महाजन (वय-४६) रा. गेंदालाल मिल हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ३ मे रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घर बंद असताना अज्ञात चोरट्याने त्यांचा मुलगा सचिन महाजन यांची घरात टांगलेली पॅन्टच्या खिशातून १४ हजार ८०० रूपयांची रोकड चोरून नेली. याबाबत महिलेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बुधवार ४ मे रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करीत आहे.

 

Exit mobile version