Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मयत निवडणूक कर्मचारीच्या कुटुंबियांना शासनाकडून १५ लाखाची आर्थिक मदत

f96aa13e 2a31 4f5d 944d b531f304ef78

यावल/फैजपूर ( प्रतिनिधी) तालुक्यातील न्हावी येथे राहणारे व जे.टी महाजन अभियांत्रीकी महाविद्यालयातील कर्मचारी पंकज गोपाळ चोपडे हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी कर्तव्यावर असतांना मयत झाले  होते. त्यांच्या कुंटुबास सानुग्रह अनुदानाचे धनादेश नुकताच आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते देण्यात आला.

या संदर्भात अधिक असे की, नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी न्हावी येथील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात फैजपुर लिपीक म्हणून कार्यरत असलेले पंकज गोपाळ चोपडे यांचे निवडणुक कर्तव्यावर असतांना निधन झाले होते. त्या अनुषगांने प्रचलीत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सिईएल२o१९साठी प्र.क्र. ४७०/१९ / ३३नुसार दिनांक १९ /४ / २०१९मधील बाब म्हणून स्व.चोपडे यांच्या कुटुबियांना १५ लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचा धनादेश आमदार हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते स्व.चोपडे यांच्या पत्नी वर्षा चोपडे यांना देण्यात आला. या प्रसंगी प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण शशीकांत चौधरी फैजपूर मंडळ अधिकारी जे.डी. बंगाळे, न्हावीच्या सरपंच भारती नितिन चौधरी, न्हावीच्या तलाठी लीना राणे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विलास चौधरी व आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version