विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या पोटातून निघाला १५ फुटांचा कृमी (व्हिडीओ)

vighnaharta hospital

पाचोरा, प्रतिनिधी | येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज (दि.९) डॉ.संदीप इंगळे यांनी एका प्रौढ व्यक्तीच्या पोटावर यशस्वी शस्त्रक्रिया करून सुमारे १५ फुट लांबीचा कृमी बाहेर काढला आहे.

 

अधिक माहिती अशी की, या व्यक्तीची पोटदुखीची मोठी तक्रार होती. सगळे उपचार करूनही आराम वाटत नसल्याने त्याच्या पोटाच्या सगळ्या तपासण्या करून त्याला अखेरीस शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार आज त्याच्यावर जनरल सर्जन डॉ.संदीप इंगळे (एम.बी.बी.एस. व डी.एन.बी.) यांनी ही शस्त्रक्रिया केली. या व्यक्तीचे वय ५० ते ५५ च्या दरम्यान असून सुमारे १५ फुटांचा कृमी पोटातून निघाल्याने तो दीर्घ काळापासून पोटात असावा, असा अंदाज आहे. हा कृमी ‘पोर्क वर्म’ प्रकारातला आहे. जो डुकराचे मांस खाण्याने पोटात जाऊ शकतो. असाच ‘बीफ वर्म’ही असतो. तसेच भाजी-पाल्यातूनही वेगवेगळ्या प्रकारचे कृमी पोटात जात असतात. त्यामुळे सगळ्यांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. इंगळे यांनी केले आहे.

 

 

Protected Content