Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्यात दिवसभरात १४ हजार ८८८ नव्या रुग्णांची भर

मुंबई – राज्यात आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक १४ हजार ८८८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे.

राज्यातील आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ७ लाख १८ हजार ७११वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत २३ हजार ८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, २४ तासांत राज्यात ७ हजार ६३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६९ टक्के एवढे आहे. तर मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३७ लाख ९४ हजार २७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७ लाख १८ हजार ७११(१८.९४टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२ लाख ६८ हजार ९२४ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर ३३ हजार ६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या राज्यात १ लाख ७२ हजार ८७३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

Exit mobile version