Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१२ तास रंगली गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाची फ्रेशर्स पार्टी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सायंकाळच्या आल्हादायक वातावरणात नृत्याच्या सादरी करणाने अनेकांची पाऊले थिरकली. हिंदी मराठी गीतांची मैफिल, जुगलबंदी, नृत्य-नाटिकांद्वारे उपस्थीतांचे मनोरंजन सूर्यास्तापासून सुरु झालेली गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाची फ्रेशर्स पार्टी तब्बल १२ तास रंगली. प्राध्यापकांच्या विनंतीला मान देऊन सूर्योदय होण्याआधी फ्रेशर्स पार्टीची जल्‍लोषात सांगता करण्यात आली.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे शुक्रवार दिनांक २० मे रोजी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला पारंपरिक वेशभूषा साकारत विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, डॉ सुहास बोरोले, हृदयविकार तज्ञ डॉ वैभव पाटील, मेम्बर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल प्रा. विवेक भालेराव, प्राचार्य शासकीय नर्सिंग कॉलेज जळगाव अनिता भालेराव, प्राचार्य डॉ मौसमी लेंढे, उप प्राचार्य मेनका ऐस पी, डायरेक्टर शिवानंद बिरादार, डीन डॉ आर्वीकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, प्रवीण कोल्हे, संकेत पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी गीतगायन, नृत्य, नाटिका असे विविध प्रकार सादर करण्यात आले. पारंपारिकपासून ते वेस्टर्न असा सर्वांचाच या पार्टीत समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.सुमित निर्मल, प्रा.सुमैय्या शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बीएस्सी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

मिस्टर अ‍ॅण्ड मिस गोदावरीसह मिस्टर अ‍ॅण्ड मिस फे्शर्स जाहिर

फ्रेशर्स पार्टीचे आकर्षण होते मिस्टर अ‍ॅण्ड मिस फ्रेशर्स कोण होणार ते सर्वांची उत्सुकता शिगेला लागल्यावर जजेसने मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस फ्रेशर्सचे नाव जाहिर केले असून यंदाच्यावर्षी जीएनएम प्रथम वर्षातील तेजस जढे हा झाला. मिस्टर फ्रेशर्स तर निकीता सयाम ठरली मिस फ्रेशर्स याशिवाय जीएनएम प्रथम वर्षातील सागर पवार हा विद्यार्थी मिस्टर गोदावरी तर बीएस्सी प्रथम वर्षातील विद्यार्थीनी आकांक्षा डोंगरे ही ठरली मिस गोदावरी आणि यावेळी उपस्थीतांनी टाळ्यांच्या कडकडाटाने आनंद व्यक्‍त केला.

असे आहेत स्पर्धांचे निकाल

नृत्य स्पर्धेत जीएनएम द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा गृपने प्रथम क्रमांक पटकाविला. जीएनएम प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या कपल डान्सला द्वितीय तर जीएनएम द्वितीय वर्षातील सोलो डान्स सादर केलेल्या गृपला तिसर्‍या क्रमांक मिळाला. गीतगायन स्पर्धेत बीएसस्सी प्रथम वर्षातील नयना कांबळे हिने प्रथम तर अभिषेकने द्वितीय क्रमांक पटकाविला. तर बीएस्सी तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्किट अर्थात नाटकाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

Exit mobile version