Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सराफा दुकानातून अनोळखी महिलेने लांबविल्या सोन्याच्या १२ अंगठ्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोन्याची अंगठी घेण्याचा बनाव करत सुभाष चौकातील शुभ लाभ ज्वेलर्स दुकानातून एका अनोळखी महिलेने १ लाख ७७ हजार ४०० रुपये किमतीच्या १२ सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्याची घटना रविवारी २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, योगेश पंढरीनाथ सुवर्णकार वय-३८, रा.गणेश कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून सोन्या-चांदीचे व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे सुभाष चौकातील भवानी माता मंदिराजवळ शुभ लाभ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दरम्यान रविवारी २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता योगेश सुवर्णकार हे दुकानात असताना १ अनोळखी महिला सोन्याची अंगठी घेत असल्याचा बनाव करत दुकानात आली. त्यानंतर अनोळखी महिलेने हात चालाखी करत तब्बल १ लाख ७७ हजार ४०० रुपये किमतीच्या १२ सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर सोन्याची व्यापारी योगेश सुवर्णकार यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री १० वाजता अनोळखी महिलेविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनगे हे करीत आहे.

Exit mobile version