Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तळेले कॉलनीत तरूणीची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तळेले कॉलनीत राहणार्‍या तरूणीची गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडकीस आली. याप्रकरणी शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील तळेले  कॉलनीतील कोमल सुनिल भालेराव ही आई वडील व लहान भावासोबत वास्तव्यास आहेत. आईच्या डोळ्यांचे ऑपरेशन असल्याने तिचे आई वडील दोघे जण दोन दिवसापूर्वी मुंबई येथे गेले होते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ते घरी परतणार होते. तसेच कोमलचा भाऊ हा जीमला गेला असल्याने कोमल ही एकटीच घरात होती. घरात कोणीच नसल्याने कोमलने घराचा दरवाजा आतून बंद करीत साडीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात किरण यादव तळेले यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास प्र्रमोद पाटील हे करीत आहे.

Exit mobile version