Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा मेडिसिन डीलर्स असोसिएशनची कार्यकारणी जाहीर

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथे पाचोरा तालुका मेडिसिन डीलर्स असोसिएशनची वार्षिक सभेत अध्यक्षपदी राजू भोसले तर सचिवपदी जितेंद्र जैन यांची निवड करण्यात आली.

वार्षिक सभा जिल्हाध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये जिल्हाध्यक्ष भंगाळे यांच्या सूचनेनुसार पाचोरा तालुका मेडिसिन असोसिएशनच्या अध्यक्षपदी पाचोरा येथील श्री मेडिकलचे संचालक राजेंद्र भोसले तर पाचोरा येथील शिवसेनेचे जितेंद्र जैन यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी ड्रग इन्स्पेक्टर माणिकराव यांच्या समवेत जिल्हा सचिव अनिल झंवर, शाम वाणी आदी प्रमुख उपस्थिती होती. जळगाव जिल्हा नवनियुक्त कार्यकारिणी व ड्रग इन्स्पेक्टर माणिकराव यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी माणिकराव यांनी मार्गदर्शन केले. अनिल झंवर यांनी प्रभू श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलनाचे आवाहन केले. जिल्हाध्यक्षांच्या संमतीने यावेळी पाचोरा तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली. अध्यक्ष राजेंद्र भोसले, उपाध्यक्ष प्रविण समदानी, सचिव निशिकांत साळुंखे म्हणून फेरनिवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी संजय शिरुडे (नगरदेवळा), निलेश पाटील (पिंपळगाव), सहसचिव पदी जितेंद्र जैन, नंदकिशोर प्रजापत, संजय तेली (कुऱ्हाड), खजिनदार ज्ञानेश्वर पाटील. संघटन सचिव पदी लुकेश वसंत, दिपक कासार(लोहारा), हिराराम देवासी, कार्यकारिणी सदस्य म्हणून किरण कोठावदे (सातगाव), दिनेश परदेशी (वरखेडी), प्रविण शेंडे, सुभाष जैन (लोहारी), विमलेश धाडीवाल, बाळू महाले, शरद मराठे, झोन प्रमुख म्हणून योगेंद्र पाटील, प्रकाश चौधरी, एकनाथ सैंदाने, यज्ञेश कासार, प्रविण चौधरी यांची एकमताने निवड करण्यात आली. सूत्रसंचालन प्रकाश चौधरी यांनी तर आभार निशिकांत साळुंखे यांनी मानले.

Exit mobile version