Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज ३७ बाधित रूग्ण आढळले; पाच तालुके निरंक

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ३७ बाधित रूग्ण आढळून आले असून ३७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. जिल्ह्यातील पाच तालुके निरंक आढळून आले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-१०, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-३, अमळनेर-४, चोपडा-१, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-३, एरंडोल-७, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-३, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि अन्य जिल्हा १ असे एकुण ३७ बधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्हयातून एकुण ५६ हजार ४६८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५३ हजार ६३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४९९ रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. सुदैवाने आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Exit mobile version