Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : जिल्ह्यात आज ४५ बाधित रूग्ण आढळले; तर १० तालुके निरंक

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून आज ४५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५१ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून दहा तालुक्यात बाधित रूग्ण आढळून आले नाहीत. तर भुसावळ तालुक्यातील एका रूग्णाचा मृत्यू झालाय.

आजची आकडेवारी
अमळने, चोपडा, पाचोरा, भडगाव, एरंडोल, जामनेर, रावेर, पारोळा, मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात एकही रूग्ण आढळून आला नाही तर जळगाव शहर- २८, जळगाव ग्रामीण -१, भुसावळ-८, धरणगाव-१, यावल-२, चाळीसगाव-२ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण ४५ रूग्ण बाधित आढळले आहे.

आजच्या कोरोना अहवालानुसार
आजच्या जिल्हा कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५५ हजार २०५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५३ हजार ५३३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३५६ रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. यात आज भुसावळ तालुक्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे एकुण मृत्यू संख्या १ हजार ३१६ पर्यंत पोहचली आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Exit mobile version