Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी ‘बाग-ए-जहानारा’ येथे १०१ बकऱ्यांचा बळी

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । लोकसभेचे खासदार आणि एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी १०१ बकऱ्यांचा बळी देण्यात आल्याची घटना हैदराबादच्या ‘बाग-ए-जहानारा’ येथे घडली आहे.

अंधश्रद्धा निर्मुलानाचं काम सुरु असलं तरी आजही बरेच लोकं श्रद्धा आणि अंधश्रध्दा यात यात गल्लत करत असतात. कुणाचा आजार बरा व्हावा किंवा कुणाला दीर्घायुष्य लाभावं या बाबीसाठी आजही बकऱ्याचा बळी देण्याची परंपरा अस्तित्त्वात आहे. अशीच काहीशी घटना हैदराबादच्या ‘बाग-ए-जहानारा’ येथे घडली आहे.

गुरुवार, दि.३ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे जात असतांना प्रवासादरम्यान मेरठच्या किथौध भागात एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींनाअटक करण्यात आली होती. या घटनेवरुन असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी ‘बाग-ए-जहानारा’ येथे एक, दोन नव्हे तर १०१ बकऱ्यांचा बळी देण्यात आला. बकऱ्यांचा बळी देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी एमआयएमच्या एका आमदारानेही हजेरी लावली होती

Exit mobile version