Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर पकडले

 

यावल, प्रतिनिधी । येथील चोपडा यावल मार्गावर तहसीलदार यांच्या मार्गदर्शना महसुलच्या पथकाने काल रात्रीच्या वेळी विनापरवाना अवैद्यरित्या डंपर या चारचाकी वाहनातुन वाळुची वाहतुक करणाऱ्यास पकडण्यात आले असुन, वाहन जप्त करण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, काल दिनांक १३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चोपडा यावल मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अंजाळे येथील तलाठी शरद सुर्यवंशी, कोतवाल निलेश गायकवाड यांच्या पथकाने अवैध मार्गाने डंपर क्रमांक एमएच १९ सिवाय ८६८६या वाहनातुन वाळुची वाहतुक करतांना पकडण्यात आले आहे. त्या डंपरवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यावल शहर व तालुक्यातील विविध ठीकाणी ट्रॅक्टरव्दारे मोठया प्रमाणावर वाळुची अवैध मार्गने वाळुची विनापरवाना सर्रासपणे वाहतुक करण्यात येत आहे. महसुल प्रशासनाने तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Exit mobile version