नंदिनीबाई कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल

जळगाव, प्रतिनिधी । येथील नंदिनीबाई वामनराव मुलीचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ८१.५९ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल हा १०० टक्के लागला आहे.

नंदिनीबाई वामनराव मुलीचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल ६४.२० टक्के लागला आहे. यात तामन्ना रमजान खाटीक कला शाखेतून ८०.४६% गुण मिळवून प्रथम आली आहे. रोहिणी कृष्णा भामरे द्वितीय ७९.२३ % तर विशाखा रमेश सपकाळे ही ७८.४६ टक्के मिळवून तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९७.८७ टक्के निकाल लागला आहे. गायत्री प्रमोद कदम वाणिज्य शाखेतून ७८.९०% गुण मिळवून प्रथम आली आहे. आश्विनी गोविंदा मुळे द्वितीय ७८.३१ तर पूजा मोहन खंगार ही ७७.८५ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. तसेच विज्ञान शाखेतून गौरी पूनमचंद अग्रवाल ७८.९२% गुण मिळवून प्रथ मक्रमांक पटकाविला आहे. पौरवी कैलास पाटील ६९.३८ टक्के गुण मिळवून द्वितीय तर जान्हवी बन्सीलाल परदेशीने ६८.३१ टक्के गुण मिळवून तृतीयस्थान पटकविले आहे.

Protected Content