Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोरा निर्मल इंटरनॅशनल स्कुलचा निकाल १०० टक्के

पाचोरा प्रतिनिधी । निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विदयार्थ्यांचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. 

निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विदयार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सन २०२० – २ १ या शैक्षणिक वर्षात इयत्ता १२ वी मध्ये ८ विदयार्थी प्रविष्ठ होते. यात सर्वच विदयार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.  सायली बोरसे हिने ८२.८० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान पटकाविला. तर  तनिष्का पाटील हिने ८०.८० टक्के गुण मिळवून व्दितीय आणि कु. मिहीका अभिजित पाटील ८०.४० टक्के गुण मिळवून शाळेत तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. 

या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य गणेश राजपूत उपप्राचार्य प्रदिप सोनवणे व प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांनी सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करण्या-या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

Exit mobile version