Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एरंडोल शास्त्री फार्मसी इन्स्टिट्यूटचा १०० टक्के निकाल

एरंडोल प्रतिनिधी । येथील शास्त्री फॉऊंडेशन संचालित शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी संस्थेचा डी. फार्मासीचा निकाल महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांनी जाहीर केला असून संस्थेचा मागील वर्षाप्रमाणे यशाची परंपरा कायम राखत प्रथम वर्ष डी.फार्मसीचा निकाल १०० % लागला आहे.

संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विजय शास्त्री यांच्या अनमोल मार्गदर्शनात संस्थेचा मागील वर्षाप्रमाणे यशाची परंपरा कायम राखत प्रथम वर्ष डी.फार्मसी चा निकाल १०० % लागला आहे. प्रथम क्रमांक सोपान राजेंद्र माळी   (८९.१८ %) व्दितीय क्रमांक वैष्णवी राजेश आंबेकर ८८.५५ %) तृतीय क्रमांक गौरव शांताराम  पाटील (७८ .०० %) गुण मिळवून यश मिळवले. व्दितीय वर्ष डी.फार्मसी चा निकाल ९४% लागला आहे. यात प्रथम क्रमांक विजया ईश्वर धनगर  (८९. ४०%) व्दितीय क्रमांक  सागर शिवाजी पाटिल  (८६.२०%) तृतीय क्रमांक रोहित शशिकांत वाणी (८५.१०%) गुण मिळवून यश मिळवले.

या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव व नारी सन्मान पुरस्कार प्राप्त सौ. रूपा शास्त्री, प्रा. हेमंत चौधरी,प्रा. महेश पाटील , प्रा.राहुल बोरसे,प्रा.भाग्यश्री नेरपगार ,प्रा.वैशाली खैरनार , प्रा.सायली भाटिया, प्रा.अंकिता नवाल,प्रा. अनिता वळवी, प्रा.करण पावरा, पी. आर. ओ. शेखर बुंदेले, कार्यालयीन प्रमुख नाना पाटील यांनी कौतुक केले व पुढील वाटचाली बद्दल शुभेच्छा दिल्या. डी. फार्मसी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच संस्थेतर्फे कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केले जाणार आहे असे प्रतिपादन संस्थेचे सचीव सौ. रूपा शास्त्री यांनी केले आहे.

 

Exit mobile version