Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयाचा १०० टक्के निकाल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद जवळील डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांचा निकाल १०० टक्के लागला. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून उच्च निकालाची परंपरा महाविद्यालयाने कायम ठेवली आहे. 

डॉ.उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयातून प्रथम टिंवकल देवपा (७८ टक्के), द्वितीय अमर दामले (७७ टक्के) तर तृतीय क्रमांक कोमल सिंग (७४ टक्के) हिने मिळविला. महाविद्यालयातून २१ विद्यार्थी परिक्षेसाठी प्रविष्ठ होते सर्वांनीच परिक्षा दिली असून सर्वच्या सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.आपल्या उच्च निकालाची परंपरा कायम ठेवली.डॉ. उल्हास पाटील फिजीयोथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, डॉ.चित्रा म्रिधा, डॉ.प्रिया देशमुख, डॉ.कल्याणी नागुलकर, डॉ.विष्णु रानडे, डॉ.अनुराग मेहता, डॉ.भवानी राणा, डॉ.सुरभी हिंदोचा, डॉ.प्रज्ञा महाजन, डॉ.श्रृती चौधरी,  डॉ.निखील पाटील, प्रशासकीय अधिकारी राहुल गिरी, भारती चौधरी यांनी मार्गदर्शन केले. 

या यशाबद्दल महाविद्यालयात जल्लोष व्यक्त केला जात आहे.  गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.

Exit mobile version