अल-सुफ्फा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के निकाल

पाचोरा प्रतिनिधी । नुकताच बारावी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून यात पाचोरा येथील अल-सुफ्फा इंटरनॅशनल स्कूलचा शैक्षणिक वर्ष २०२० – २१ यात अंतर्गत मूल्यमापन आधारे सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान शाळेची ही पहिली १२ वीची बॅच असुन १०० टक्के निकाल लागला आहे. 

यात ऊज़मा जबीन अब्दुल रहीम – ८६ टक्के, समीर शकील बागवान – ८५ टक्के, शारीक खान शरिफ खान – ८२ . ६६ टक्के, इरम शेख बशीर – ८१ . ६६ टक्के, तांबोली आफताब शेख अनिस – ८१ . १६ टक्के, आफरीन शेख शकूर टकारी – ७९ . १६ टक्के, सालेहा आरिफ मनियार – ७७ . ८३ टक्के, बागवान अबू हनज़ला – ७५ . १६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी यांचे संस्था चालकांनतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या यशासाठी अल-सुफा फॉउंडेशन संस्थेचे अध्यक्ष हाजी मुस्लिम बागवान, डायरेक्टर मो. इमाद बागवान, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका खनसा सिद्दिका रईस सौदागर व शिक्षक विजय बाविस्कर, सय्यद मो. जुबेर, फरझाना खालील शेख, कलार्क शेख खालील अहेमद या सर्वांचे अनमोल मार्ग दर्शन लाभले आहे. सर्व विद्यार्थ्याना त्याच्या उज्वल भविष्यासाठी संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Protected Content