Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१०० टक्के निकाल : सुवर्णमहोत्सवी शाळेतील गुणवंतांचा सत्कार

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूलचा दहावीच्या परिक्षेत १०० टक्के निकाल लागल्याने शाळेतील गुणवंतांचा महापुरुषांचे अनमोल ग्रंथ देऊन गुणगौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दहावीचे वर्गशिक्षक पी.डी.पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस. पवार होते. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांना वंदन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम शाळेतून प्रथम,द्वितीय,तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपल्या पालकांसह महापुरूषांचे अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापकांनी गुणवंतांना पेढा भरवून आनंद व्यक्त केला.

यामध्ये रोहन सुनिल गजरे शाळेतून  ९१ % गुण संपादन करून प्रथम आला. द्वितीय क्रमांकाने राज मनोज पटुणे ८९.४० % तर तृतीय क्रमांकाने  कु. मयुरी साहेबराव पाटील ८७.८० % मिळवुन यश संपादन केले. विशेष प्राविण्यसह २४ मुले, प्रथम श्रेणीत १५ मुले, द्वितीय श्रेणीत ४ मुले असे ४३ पैकी ४३ मुले पास होऊन शाळेचा १०० % निकाल लागलेला आहे. विद्यार्थ्यांनी शाळेच्या शाळेच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

१० वी चे वर्गशिक्षक एस.व्ही.आढावे व कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी मुलांना अनमोल असे मार्गदर्शन केले व मुलांचे कौतुक केले.

याप्रसंगी सुवर्ण महोत्सवी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, पर्यवेक्षक एम.बी.मोरे, ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे, बाभळे येथील पालक कविता सूनील गजरे, वंदना दामू गजरे, पार्वती मनोज पटुणे, कल्याणेहोळ येथील आशा वर्कर अनिता साहेबराव पाटील, इ.१० वी चे  वर्गशिक्षक पी.डी.पाटील, एस.व्ही.आढावे तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी कर्मचारी वृंद उपस्थित होते. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.डी.पाटील तर आभार एस.एन.कोळी यांनी केले.

Exit mobile version