Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाघूर धरणाचे १० दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना इशारा

जळगाव प्रतिनिधी | सतत सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे वाघूर धरणातील जलसाठ्यात वाढ झाल्यामुळे आज सायंकाळी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आजवर अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे वाघूर धरणातील जलसाठा वाढला नव्हता. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात अचानक साठ्यात वाढ झाली आहे. सायंकाळी धरणातील पाणी साठा ८४ टक्के इतका पोहचला. यामुळे पाटबंधारे खात्याने धरणाचे दहा दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडले आहेत. रात्रीतून पाण्याची आवक झाल्यास अजून दरवाजे उघडण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने खालील बाजूस असणार्‍या नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कुणीही नदीपात्रात जाऊ नये अथवा गुरांना नेऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

 

 

Exit mobile version