Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मालमत्ता करात १० टक्के सूट घेण्यासाठी शेवटचे चार दिवस शिल्लक

WhatsApp Image 2019 04 25 at 11.58.58 AM

जळगाव (प्रतिनिधी)  महापालिकेच्या चारही प्रभाग समित्याच्या कार्यालयात  ३०  एप्रिलपर्यंत  मालमत्ता कराचा भरणा केल्यास १० टक्के सूट दिली जात आहे. आज या सूटचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी चारही प्रभाग समिती कार्यालयावर गर्दी केली होती. आज चारही प्रभाग समिती कार्यालयात एकत्रितपणे  १ कोटी ३७ लाख ७३ हजार ५०७ रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.  दरम्यान, उद्या व रविवारी प्रभाग कार्यालयात मालमत्ता कराचा भरणा स्वीकारणे साठी कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहेत.

 

आज चारही प्रभाग समितीनिहाय भरणा झालेली रक्कम पुढीलप्रमाणे, यात  प्रभाग समिती क्र. १ मध्ये ३९ लाख ८९ हजार १८७ रोख तर १२ लाख ८० हजार २६९ रुपये धनादेशद्वारे असे एकूण ५२ लाख ६९ हजार ४५६ रुपयांचा भरणा करण्यात आला.  प्रभाग समिती क्र. २ मध्ये ११ लाख ९ हजार ४६६ व धनादेश ४ लाख ३ हजार असे एकूण १५ लाख १२ हजार ४६६ रुपयांचा भरणा झाला आहे. प्रभाग समिती क्र. ३ मध्ये २० लाख ५९ हजार रोख व १० लाख रुपयांचे धनादेश असे ३० लाख ५९ हजार रुपयांचा भरणा झाला. तर प्रभाग समिती क्र. ४ मध्ये ३४ लाख रोख तर ५ लाख ३२ हजार ५८५ रुपयांचे धनादेश असे एकूण ३९ लाख ३२ हजार ५८५ रुपयांच्या भरणा झाला आहे.

Exit mobile version