“10 का दम खेलो इंडिया” स्पर्धेत सावद्याच्या जिज्ञासा भारंबेचे यश

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमरावती येथे झालेल्या १० का दम खेलो इंडिया वुमन आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या सब जुनिअर रिकर्व्ह प्रकारात जळगाव जिल्हा आर्चरी असोसिएशनची खेळाडू जिज्ञासा प्रशांत भारंबे हिने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत दुसरा क्रमांक पटकावला आहे.

अधिक माहिती अशी की, महिलांच्या उत्थानासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग यांच्या संकल्पनेतून “10 का दम खेलो इंडिया वुमन आर्चरी चॅम्पिअनशिप स्पर्धेचे आयॊजन 26 मार्च रोजी अमरावती येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील महिला धनुर्धर सहभागी झाले होते. यात सब जुनिअर रिकर्व्ह प्रकारात जळगाव जिल्हा आर्चरी असोसिएशनची खेळाडू जिज्ञासा प्रशांत भारंबे हिने आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत दुसरा क्रमांक पटकावला. तिला ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले. तिला तिचे प्रशिक्षक रायमल भिलाला यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या या यशासाठी जळगाव जिल्हा आर्चरी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडीयम स्कूल च्या मुख्याध्यपिका भारती महाजन यांनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content