कोरोना : जिल्ह्यात आज १ हजार १४१ बाधित रूग्ण आढळले; बोदवड, पाचोरा तालुक्यात संसर्ग वाढला !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यात आढळून आलेल्या रूग्णांपेक्षा बरे होणारे रूग्ण जास्त आहेत. दिवसभरात जिल्ह्यात आज १ हजार १४१ रूग्ण आढळून आले असून १ हजार १७१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जळगाव शहरासह पाचोरा आणि बोदवड तालुक्यात संसर्ग वाढलेला दिसून येत आहे. 

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर-१६८, जळगाव ग्रामीण-२७, भुसावळ-१०२, अमळनेर-५३, चोपडा-७९, पाचोरा-१२१, भडगाव-३२, धरणगाव-५५, यावल-६२, एरंडाल-४१, जामनेर-४४, रावेर-८८, पारोळा-३७, चाळीसगाव-३२, मुक्ताईनगर-९२, बोदवड-१०३ आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकुण १ हजार १४१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत ९७ हजार ९९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ८३ हजार ६७१ रूग्ण बरे होवून घरी पतरले आहे. तर ११ हजार ७०२ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जिल्ह्यात १४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

Protected Content