Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चहाच्या टपरीतून १ लाख ७५ हजारांची रोकड लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महात्मा गांधी मार्केट समोरील चाहाच्या टपरीतून १ लाख ७५ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भिका लिंगा गवळी (वय-३८) रा. दालफळ गवळी, शनिपेठ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे महात्मा गांधी मार्केट समोर चहाची टपरी असून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार १ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ते त्यांच्या चहाच्या टपरीजवळ उभे असतांना चार अनोळखी व्यक्ती आले. त्यापैकी एकाने चहाच्या टपरीत ठेवलेली बॅगेतून १ लाख ७५ हजाराची रोकड लांबविली. हा प्रकार लक्षात आल्यावर भिका गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून घटनेची माहिती दिली. याप्रकरणी गुरूवार २ जून रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.

 

Exit mobile version