Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकी खरेदी करून देण्याचा बहाणा करून १ लाख ६६ हजारांची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकी खरेदी करून देण्याचा बहाणा करून एका ६१ वर्षीय वृध्दाची १ लाख ६६ हजार १११ रूपयांची फसवणूक केल्याची घटना शहरातील टॉवर चौकात घडली आहे.   याप्रकरणी गुरूवार ३१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता तीन जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चंद्रकांत सदाशिव इसे (वय-६१) हे आपल्या परिवारासह खोटे नगर परिसरात वास्तव्याला आहे. टॉवर चौकात दत्त शोरूम आहे. त्यांच्या दोन मोपेड दुचाकी घ्यायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी दिपक उर्फ मनोज हिरालाला कोळी रा. कांचन नगर, जळगाव आणि सुमित राजू सपकाळे रा. पांझरापोळ, जळगाव यांची भेट घेतली. मनोज काळी, सुमित सपकाळे आणि दत्त शोरूमचे मालक या तिघांनी संगनमत करून चंद्रकांत इसे यांच्याकडून दुचाकी खरेदी करण्यासाठी १ लाख ६६ हजार १११ रूपये घेतले. पैसे घेवून मोपेट दुचाकी दिली नाही, किंवा घेतलेले पैसे परत केले नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चंद्रकांत इसे यांनी गुरूवारी ३१ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तिघांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी मनोज कोळी, सुमित सपकाळे आणि दत्त शोरूमचे मालक यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमित सपकाळे आणि मनोज कोळी यांना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरासागर करीत आहे.

Exit mobile version