Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंद घर फोडून १ लाख २२ हजारांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजीनगर, हुडको भागातील बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख २२ हजार रुपये रोख चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे.  हा प्रकार समोर आल्यानंतर शनिवारी २२ जुलै रोजी रात्री ११ वाजता  शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात राहणारे चालक चांद खान इमाम खान (५०) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १६ जुलै रोजी ते अमरावती जिल्ह्यात एका गावी गेले होते. त्यावेळी १६ जुलै ते २० जुलै दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात एका लिफाफ्यामध्ये ठेवलेले १ लाख २२ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. खान हे घरी आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्या वेळी त्यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनास्थळी पोलिस उप अधीक्षक संदीप गावित, पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी शनीवारी २२ जुलै रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय निकुभ करीत आहेत.

Exit mobile version