Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बनावट कागदपत्रे दाखवून १ कोटीची फसवणूक करणाऱ्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बनावट फर्मची खोटी कागदपत्र दाखवित त्यांना जास्त रकमेचा मोबदला मिळण्याचे अमिष दाखवून चंदूआण्णा नगरातील व्यवसायिकाला १ कोटी रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या नंदू सुदाम बोरसे याला गुजरातमधील भूज येथून तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आण्णा नगरातील रेणुका नगरात भाऊसाहेब भाऊराव पाटील हे व्यावसायीक वास्तव्याला आहे. त्यांना नंदू सुदाम बोरसे व त्यांचा भाऊ दिपक सुदाम बोरसे यांनी त्यांच्या झेरॉक्स २४ फर्मची बनावट कागदपत्र दाखविली. तसेच तुम्हाला जास्त रकमेचा मोबदला मिळेल असे अमिष दाखवून त्यांच्याकडून १ कोटी रुपयांची फसवणुक केल्याचे १८ जुलै रोजी २०२३ होती. त्यानंतर संशयितांनी पिंप्राळा शिवारातील फ्लॅट विकत घेतला आहे. याप्रकरणी भाऊसाहेब पाटील यांच्या तक्रारीवरुन जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस संशयितांच्या शोधार्थ असतांना त्यांना नंदू बोरसे यांच्या मोबाईलचे लोकेशन गुजरात राज्यातील भूज येथे असल्याचे समजले. त्यांनी लागलीच पथक तयार करुन स्थानिक पोलिसांची मदत घेवून नंदू बोरसे याच्या मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता मुसक्या आवळल्या. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडून २ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या संशयिताला त्याचा भाऊ दीपक याच्याबाबत विचारपूस केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. दरम्यान, बुधवारी २० सप्टेंबर रोजी संशयिताला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीखक अनंत अहिरे करीत आहे.

Exit mobile version