Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सेवानिवृत्त फौजदारावर कारवाईसाठी फैजपूरात मोर्चा (व्हिडीओ)

faizpur news

फैजपूर प्रतिनिधी । येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हद्दपार करून त्यांच्यावर कारवाईसाठी आज शनिवारी नागरीकांना प्रांतकार्यालयावर मोर्चा काढला.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसापूर्वी शेख शकील व माजी नगरसेवक यांच्यात वाद होऊन दंगलीचा गुन्हा दाखल झाला होता. सेवानिवृत्त पोलीस शेख शकील शेख दगू व त्याचे सहकारी शहरात दहशत पसरवून परिसरातील लोकांकडून खंडणी वसूल करण्यात गावात जातीय तेढ निर्माण करणे आदी कृत्य करत आहे. शेख शकील याच्या विरुद्ध रावेर, सावदा, यावल व फैजपूर पोलीस ठाण्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्याला हद्द पार करावे, त्याच्यावर कडक कारवाई होऊन शेख जफर यांच्या विरुद्धचे गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी निवेदन देते वेळी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
मोर्च्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून त्यानंतर प्रांत कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी पीआरपीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनावणे, भुसावळ कृषी उत्पन्न बाजार सभापती सचिन चौधरी, धिरज अनिल चौधरी, भुसावळ नगरसेवक दुर्गेश ठाकूर, पीआरपी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख आरिप, गोपी साळी, अलिशान तडवी, शेख इसुफ शेख सत्तार, शेख इरफान, रईस मोमीन, शाबास खान, मलिक आबिद, अब्दुल सत्तार काँग्रेस शहराध्यकक्ष; रियाज शेख शबीर , राष्ट्रवादी अध्यक्ष अन्वर खाटीक, युवक काँग्रेस शेख वसीम यांच्या सह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

चौकशी अहवाल मागविला
यावेळी दरम्यान मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केल्यामुळे त्यांना शेख शकील याच्या विरुद्ध डीवायएसपी कार्यालयाकडून चौकशी अहवाल मागविण्यात आला असून तो प्राप्त झाल्यावर पुढील योग्य यी कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पात्र प्रांधिकारी यांच्याकडून देण्यात आले. तसेच जळगाव येथेही जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही शहरातील प्रतिष्टीत नागरीकांनी निवेदन देत शेख शकील याच्याविरुद्ध कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी सपोनि प्रकाश वानखेडे, पीएसआय जिजाबराव पाटील, यांच्यासह सहकारी पोलीस बंदोबस्त ठेवला.

Exit mobile version